Voice of Eastern

मुंबई : 

आजच्या व्हिडिओ सॉंगच्या जमान्यान नवनवीन संकल्पनांवर आधारलेली गाणी संगीत प्रेमींचं मनोरंजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संगीतातील या नव्या ट्रेंडमध्ये मराठी संगीतक्षेत्रही आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. मागील बऱ्याच काळापासून मराठीतही दर्जेदार व्हिडिओ साँग्जची निर्मिती केली जात आहे. हिच परंपरा पुढे सुरू ठेवणारं एक नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. रुद्रा मुव्हीज अँड एन्टरटेन्मेंटनं आणि पिकलं म्युजिक प्रस्तुत ‘माझे राधे गं…’ हे एक धमाल प्रेमगीत नुकतंच रिलीज केलं आहे. या गाण्याच्या पोस्टरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

निर्माते दिलीप ढेकळे, मोहन शिखरे, सचिन येवले, विकास करंडे आणि हरीदास माळवे यांनी रुद्रा मुव्हीज अँड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार केलेल्या, तसेच पिकल म्युझिकचे समीर दीक्षित आणि हृषीकेश भिरंगी यांची प्रस्तुती असलेलं ‘माझे राधे गं…’ हे गाणं प्रेमाचे नवे रंग उधळणारं आहे. अंधेरी येथील आफ्टरप्ले येथे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत हे गाणं लाँच करण्यात आलं. आजच्या युगातही राधेकडं प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. ‘माझे राधे गं…’ या गाण्यातील राधा नेमकी कशी आहे ते रसिकांना व्हिडिओ साँग पाहिल्यावरच समजणार आहे. मोहन शिखरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्यात विशाल फाळे आणि संजना काळे ही एक नवी जोडी पहायला मिळणार आहे. अस्मी चौधरी आणि सोहन सिनलकर या दोन बाल कलाकारांनीही यात परफॅार्म केलं आहे. शैलेश परशूराम गावंड यांनी लिहिलेलं गाणं संगीतकार मिलिंद मोरे यांनी कल्पेश नाटे आणि प्रिती निमकर जोशी यांच्या मधुर आवाजात संगीतबद्ध केलं आहे. आजवर प्रेमावर आधारलेली असंख्य गाणी आली आहेत, पण या गाण्यात काहीसे वेगळे भाव पहायला मिळत आहेत. भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि मोरपीसाची सांगड राधेच्या निखळ प्रेमाशी घालण्यात आली आहे. रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याच्या पोस्टरवरील विशाल आणि संजनाची जोडी सहज लक्ष वेधून घेते. दोघांच्याही चेहऱ्यावरील निरागस प्रेमाचे भाव ‘माझे राधे गं…’ या गाण्याबाबत मनात कुतूहल निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतात. दोघांनीही या गाण्यात अप्रतिम अभिनय आणि नृत्य केलं असून, लहानग्या अस्मी आणि सोहनचा परफॅार्मंसही सुरेख झाला आहे. गीतकारानं लिहिलेल्या प्रेमळ शब्दांना संगीतकारानं त्याच प्रेमभावनेतून संगीत देण्याचं काम केलं आहे.

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यानं या गाण्यासाठी फ्लॅशबॅक शूटसाठी स्पेशल डिओपी म्हणून काम केलं आहे. जितेश कदम यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली असून, सिनेमॅटोग्राफी सिद्धराज सावंत यांची आहे. गंधाली कुलकर्णी यांनी हे गाणं संकलीत केलं आहे, तर जयश्री आणि मनाली भोसले यांनी मेकअप आणि हेअर ड्रेसिंग केलं आहे. कोकणातील रत्नागिरी येथील मीरा बंदर बीच आणि पनवेलमधील दूरशेत गावात शूट झालेल्या या गाण्याचे कार्यकारी निर्माता राजेंद्र सावंत असून, कैलाश पवार क्रीएटिव्ह हेड आहेत.

Related posts

बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळं सज्ज

Voice of Eastern

घाटकोपरमध्ये ७० लाखांचे महागडे मोबाईल जप्त

दीक्षांत समारंभात मानापमान नाट्य; सिनेट सदस्यांना व्यासपीठावर स्थान नाही

Voice of Eastern

Leave a Comment