Voice of Eastern
पूर्व उपनगर

नरवीर चिमाजी अप्पा ” या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा

banner

मुंबई

मराठीत सध्या मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती होत आहे. आणि या सकारात्मक वातावरणात ‘नरवीर चिमाजी अप्पा एक अविस्मरणीय योद्धा ‘ या ऐतिहासिक चित्रपटाची एका आनंददायक सोहळ्यात घोषणा करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर डिझाईनचे अनावरण केले आणि या चित्रपटाची घोषणा झाली.

सतीश रणदिवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत पंचवीस मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट महेश नेने प्राॅडक्सन्सच्या वतीने निर्माण होत असून जय सरपोतदार सहनिर्माते आहेत. तर राहुल मिर्लेकर कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा महेश नेने यांची आहे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन दिलीप मोरे यांचे आहे.

नृत्य दिग्दर्शन विवेक सावंत ह्यांचे असून मारहाण दिग्दर्शन मनोहर वर्मा यांचे आहे. या चित्रपटातील कलाकारांची निवड व्हायची आहे. या सोहळ्यास इतिहास संशोधनकार पांडुरंग बलकवडे, शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर तसेच शिल्पा सरपोतदार आणि चित्रपटसृष्टीतील वर्षा उसगावकर, विजय पाटकर, रुचिरा जाधव, रेवती लेले, कीर्ती आडारकर, सुझान बर्नेट इत्यादी कलाकार हजर होते. हा सोहळा अतिशय आटोपशीर असा झाला.

Related posts

गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन

हाफकिनचा “राज्यस्तरीय उत्कृष्ट निर्यातदार” पुरस्काराने गौरव

Voice of Eastern

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा – प्रशांत, आकांक्षा ठरले विजेते

Leave a Comment