सध्या देशात कोरोनाचा संकट सुरू असताना देखील नवरात्रौत्सवच्या निमित्ताने आपल्या माय माऊलीचे दर्शन घेण्यासाठी दिल्लीत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कलकत्ता येथे १५० फूट उंच मंडप तर तेलंगणा येथे ४५ फूट उंच देवीची मूर्तीची प्राणप्तिष्ठापना करण्यात आली आहे.हैद्राबाद येथील इस्मिया बाजार येथे देखील ४५फूट उंच पर्यावरण पूरक देवीची मूर्ती विराजमान करण्यात अली आहे. तब्बल ३५ दिवसांच्या कठोर परिश्रम करून २२ कामगारांनी ही संपूर्ण मूर्ती तयार केली आहे असे मत मंडळाचे आयोजक गुलाब श्रीनिवास गंगापुत्र यांनी यांनी सांगितले.
हे पण वाचा – मुंबईची माऊली तेलंगणाच्या मंदिरात…
बुर्ज खलिफाचा देखावा
दरवर्षी कोलकत्ता येथे दुर्गा पूजेचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. विविध देखावे आणि सजावटीची वेगळीच चमक विविध मंडळात पाहायला मिळत असते. कलकत्ता लेकटाउन येथील श्री भूमि स्पोर्टिंग क्लब येथे दुर्गा पूजासाठी बुर्ज खलीफा वर आधारित तब्बल १५० फूट उंच देखावा उभारण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळीस या मंडळात तब्बल ३०० विविध रंगांची रोषणाई करण्यात आली आहे. हे पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मंडळात येणाऱ्या भाविकांना खरा बुर्ज खलिफाचा अभास होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या एक्रेलिक शीटचा वापर करण्यात आला आहे जो प्रकाश अजून उकळून येतो. तब्बल २५० पेक्षा अधिक कामगारांनी ३ महिने काम करून हा संपूर्ण देखावा उभारण्यात आल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा – मुंबईत नवरात्रोत्सवात गरबा नाही …
मुंबईत उत्सव साधेपणाने
राज्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बृहन्मुंबई महानगरालिकाने सुचवलेल्या सर्व नियमांचे पालन करत तसेच सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने यंदाचा नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. मात्र शासनाने यंदा तरी देखील भाविकांच्या श्रध्देचा विचार काही प्रमाणात सुट द्यायला हवी होती असे मत मुंबईची नवरात्री संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आशिष नरे यांनी व्यक्त केले.