Voice of Eastern

मुंबई : 

रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… रामदेवबाबा हाय हाय… समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो… मुखी राम राम बोला… याला जोड्याने हाणा… अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेवच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा फोटो काढणार फोटोग्राफर सरकारी दरबारी बेदखल

मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, उत्तर मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, महिला, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा : अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाची इमारत दुरुस्ती करू किंवा पर्यायी जागा देऊ – चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पतंजलीमार्फत घेण्यात आलेल्या महिला महासंमेलनामध्ये योगगुरू रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला साडी आणि सलवारमध्ये छान दिसतात, मात्र काही घातलं नाही तरीही त्या छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले. रामदेव बाबांच्या या वक्तव्याने आता नवा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे पतंजलीच्या या महिला महासंमेलनामध्ये उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे सुध्दा उपस्थित होते.

मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो… मुखी राम राम बोला… याला जोड्याने हाणा… अशा जोरदार घोषणा देत रामदेव बाबांचा निषेध केला आहे.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या फरकामध्ये पुन्हा लबाडी – श्रीरंग बरगे यांची सरकारवर टीका


 

 

Related posts

महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे

प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून अभिनंदन

Voice of Eastern

राज्य कबड्डी निवड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरचा पराभव

Leave a Comment