मुंबई
राज्यामध्ये दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी ८ नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबईमध्ये ७ तर वसई-विरार महापालिकेमध्ये एक रुग्ण सापडला. यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. हे सर्व रुग्ण २४ ते ४१ वयोगटातील असून, त्यांच्यापैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी ७ रुग्ण हे मुंबईतील तर १ रुग्ण वसई विरार येथील आहेत. या सर्वांचे नमूने हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आलेले होते. ८ रुग्णांमध्ये ३ स्त्रिया तर ५ पुरुषांचा समावेश आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या ८ पैकी ३ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नसून, ५ रुग्णामंध्ये सौम्य स्वरुपाचे लक्षण आहे. या आठही जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचा इतिहास नाही. मात्र एकाने बंगळूरू तर एकाने दिल्ली प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्ती राजस्थान मधील आहे. ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. नव्याने सापडलेल्या ८ रूग्णांपैकी ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एकाचे लसीकरण झालेले नाही.
राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची आकडेवारी
- मुंबई – १२
- पिंपरी चिंचवड – १०
- पुणे मनपा – २
- कल्याण डोंबिवली – १
- नागपूर -१
- लातूर -१
- वसई विरार -१