Voice of Eastern

मुंबई : 

एसटीची अत्याधुनिक, विना वातानुकूलित शयनयान बस ५ ऑक्टोबर २०२३ पासून मुंबई सेंट्रल ते बांदा या मार्गावर धावणार आहे. ३० शयनकक्ष असलेल्या या बसचे मुंबई ते बांदा दरम्यानचे भाडे १२४६ रुपये इतके असणार आहे. विशेष म्हणजे शासनाने देऊ केलेल्या अमृतजेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिलांसाठी असलेल्या सवलती या बसला लागू करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बांदा सह बोरीवली –बांदा या मार्गावर शयनयान बसेस सुरू करण्यात येत आहेत.

अत्याधुनिक व सुरक्षितता याचा सुंदर मिलाफ या बसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ३० शयनकक्ष असलेल्या या बसमध्ये प्रत्येक शयनकक्षामध्ये मोबाईल चार्जिंग व्यवस्था, प्रत्येक कक्षाला स्वतंत्र खिडकी व पडदे, प्रवाशांना झोपण्यासाठी गादीसोबत उशी, रात्रीच्या वेळी वाचण्यासाठी रिडिंग लॅम्प या सुविधाबरोबर सुरक्षिततेसाठी आपत्कालीन दरवाजा, आग प्रतिबंधक उपकरणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काचा फोडण्यासाठी हातोडे, चालकाच्या केबिनमध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सावध करण्यासाठी अनाउन्समेंट सिस्टम, प्रवाशांचे सामान बसच्या सामान कक्षात ठेवण्याची फक्त डाव्या बाजूला केलेली व्यवस्था अशा उपाययोजना केल्या आहेत.

सध्या एसटीच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये ५० शयनयान बसेसची बांधणी सुरू आहे. टप्याटप्याने या सर्व बसेस लांब पल्याच्या मार्गासाठी प्रवासी सेवेत दाखल होतील.

शयनयान बसेसचे तिकीट दर

Related posts

जे. जे. रुग्णालयामध्ये रक्तदान अभियानाचा शभारंभ

मुंबईत उभारला जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रध्वज

बेरोजगार उमेदवारांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

Leave a Comment