Voice of Eastern

मुंबई :

पवई महात्मा फुले नगर हद्दीत येथे बुधावारी नवजात अर्भक सापडले. दोन दिवसांचे हे स्त्री अर्भक असून त्याची प्रकृती उत्तम आहे. व देखभालिसाठी बाळाला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेची पार्क साईड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले

पवई येथील महात्मा फुले नगर लगत असणाऱ्या झुडपात एक स्त्री जातीचं नवजात अर्भक मिळाले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळच्या सुमारास येथून रहदारी करणाऱ्या एका तरुणाला ही बाब लक्षात आली. त्याने लगेच स्थानिकांना माहिती देत, पाेलिसांना सूचना दिली. अर्भक एक दिवसाचे असून, पाेलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्त्री लिंगी असलेल्या शिशूची प्रकृती सध्या चांगली असून, त्याच्यावर उपचार महात्मा फुले प्रसूतिगृहात उपचार सुरू आहेत. येथील जंगलाचा भाग निर्जन असून या ठिकाणी फारशी रहदारी नाही हे अर्भक येथे सोडल्याचा अंदाज आहे.

पवई आय आयटी मार्केट शेजारी वसलेल्या महात्मा फुले नगर परिसराला लागूनच असलेल्या जंगलातून मार्ग काढत भांडूपच्या दिशेने अनिकेत मगर हा तरूण जात होता. अचानक त्याला लहान बाळ रडत असल्याचा आवाज येताच, एका गोणीत रक्तबंभाळ अवस्थेत नवजात अर्भक त्याला दिसले. त्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सुखरूपरीत्या वाचवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटनेची माहीती मिळताच स्थानिक नगरासेविका जागृती पाटील घटनास्थळी येवून नवजात बाळाला भांडूपच्या सावित्रीबाई प्रसुति रूग्णालयात दाखल केले असून पार्क साईड पोलिस पालकांचा शोध घेत आहेत.

Related posts

निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करणार राज्यस्तरीय संस्था – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका

मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी!

Voice of Eastern

Leave a Comment