Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

वृत्तपत्र विक्रेत्यांनी उचलली मराठी राजभाषा संवर्धनाची जबाबदारी; हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

banner

मुंबई :

मराठी वर्तमानपत्राद्वारे रोज माहिती, मनोरंजन, मराठी साहित्य, राजकारण, अर्थकारण, रोजगार, कला, क्रीडा, सिनेमा – वाद्यवृंद, विज्ञान, आरोग्य, हवामान, सण, भौगोलिक घडामोडी, यांचा लेखाजोखा मराठी भाषेत आपल्यापर्यंत नियमित पोहोचत असतो. ही मराठी भाषेची गंगा प्रत्येकाच्या घरात नेऊन ठेवण्याचे पवित्र कर्तव्य वृत्तपत्र विक्रेते नियमितपणे बजावत असतात. याच वृत्तपत्र विक्रेत्यांनी मराठी भाषा संवर्धनाचे अत्यंत महत्त्वाचे काम करण्याचा संकल्प सोडला आहे. आपल्या मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण, मराठी भाषेची जवळीक, निर्माण करून देण्याची जबाबदारी म्हणून मुंबईच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अशी असेल स्पर्धा

हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मुलांना आवडणार्‍या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातून वहीचे एक पान भरेल एवढा मजकूर आपल्या हस्ताक्षरात लिहावयाचा आहे. वर्तमानपत्रातील मजकुराचे कात्रण वहीच्या डाव्या पानावर चिटकवायचे आहे. आपला मजकूर उजव्या पानावर लिहावयाचा आहे. किमान २५ पान भरलेली वही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. २२ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशित होणार्‍या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातील रोज एक पान याप्रमाणे आपण वहीत लिहू शकता. वर्तमान पत्राचे कात्रण चिकटाविल्यानंतर त्याखाली वर्तमानपत्राचे नाव व दिनांक लिहावा. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे गट आहेत. तसेच सर्वांसाठी खुला गट असुन प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक असून १०० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले आहे.

स्पर्धेचे अटी व नियम

 • २२ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोणत्याही २५ वेगवेगळ्या दिवसाच्या
 • वर्तमानपात्रामधून २५ मजकूर लिहणे बंधनकारक असेल.
 • वहीचा आकार ६ इंच x ८ इंच असावा.
 • वही स्विकरण्याची अंतिम तारीख – ५ मार्च २०२२
 • वहीवर आपले नाव, पत्ता, इयत्ता आणि मोबाईल नंबर व शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
  विजेते आणि सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल
 • स्पर्धेचा निकाल वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल.
 • ही स्पर्धा विनामूल्य आहे.
 • https://sparkevent.in/hastakshar-spardha-२०२२ अथवा
 • व्हाट्सअपवर ८१६९५ ५३९६४ नाव नोंदणी येथे करावी.
 • स्पर्धेबाबतचा अभिप्राय वहीच्या शेवटच्या पानावर लिहावा.

या पत्यावर वह्या स्विकारल्या जातील :-

१) १५/१, बी.डी.डी . चाळ, डिलाईल रोड, ना.म. जोशी मार्ग, लोअरपरळ (पू), मुंबई – १३

२)४०२, अभिलाषा बिल्डींग, प्लॉट नंबर ८६, डेलीकसी हॉटेलच्या वरती, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७

३) इमारत क्रमांक ४ / ४०१, गणेश आशीर्वाद को . हौ. सो., भारत नगर समोर, टागोर नगर विक्रोळी ( पूर्व ) मुंबई ४०००८३

Related posts

सिडको स्थापन करणार ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्ष

रेखाकला व लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी; कलासंचालनालयाची तारेवरची कसरत

Voice of Eastern

केईएममधील शवागृह २४ तास खुले राहणार

Leave a Comment