विक्रोळी :
मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जवळ आली आहे. शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. आज विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचा लोकपर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचा समाजार घेतला आहे. काळी मांजरे, कोल्हे लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालत का ? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
सामाजिक कार्यामूळे शिवसेना उभी आहे. काळी मांजरे, कोल्हे लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालत का ? 50 वर्षात यांची कोणाची पर्वा केली नाही मग आता कशाला करायची, ईशान्य मुबंई शिवसेनेची भिंत आहे. किती पण डोकं आपटलं तरी काही फायदा नाही असा सल्लादेखील त्यांनी विरोधकांना दिला. हे सरकार आपलं आहे. हे ठाकरे सरकार आहे असेही राऊत म्हणाले.
कोणाच्या बापाला जमलं नाही
गेल्या ५० वर्ष अनेक बाप निर्माण झाले, दिल्लीतून अनेक लोक आले पण कोणाच्या बापाला जमलं नाही महानगरपालिकेच्या मुख्यालयातुन सेनेचा झेंडा उतरवणे, आणि शक्यही होणार नाही. शिवसेनेचा नगरसेवक हा लोकसेवक असतो असे राऊत म्हणाले.