मुंबई :
शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १२ व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार २०२२ चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीदजी खॉं, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.
हेही वाचा : २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा फोटो काढणार फोटोग्राफर सरकारी दरबारी बेदखल
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदेजी, रवींद्र साठे, डॉ.रवींद्र कोल्हे, डॉ.स्मीता कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, कमलाबाई शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही. आज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तिरस्कारालाही तोंड द्यावे लागते, मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा : देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१२ व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार २०२२ चे वितरण शनिवारी झाले. फ.मुं. शिंदेजी, रवींद्र साठे, डॉ.रवींद्र कोल्हे, डॉ.स्मीता कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, कमलाबाई शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीदजी खॉं, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.
हेही वाचा : अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय सुरू