मुंबई :
ईशान्य भारतातील सौंदर्य तसेच विविध घटकांची माहिती करून देण्यासाठी द न्यु एक्स्पिडिशन (नॉर्थ-इस्ट ऑन व्हील्स) या उपक्रमाअंतर्गत देशातील ७५ बाईकर्स ८ एप्रिल २०२२ ईशान्येकडील राज्यांची सफर करणार आहेत. आसाममधील गुवाहटी येथून या प्रवासाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशभरांतून आलेले हे रायडर्स ८ दिवसांमध्ये ईशान्येकडी राज्यांमधून १४०० किमीचा प्रवास करणार आहेत.
‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी अमेझिंग नमस्ते फाऊन्डेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नवी दिल्लीतून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भारत सरकारच्या संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री मिनाक्षी लेखी उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रवासमध्ये जोवाई, मोईरांग, इम्फाळ, कोहिमा, बुमला पास, तेजपुर इत्यादींचा समावेश आहे. सहभागी लोकांना राष्ट्रीय हिरोज जसे रानी माँ गाईदिनलिऊ, कियांग नानबाग, नेताजी सुभाषचंद्र बोस, कनकलता, जसवंत सिंग आणि अन्य लोकांच्या स्थळांनाही भेट देता येणार आहे.
ईशान्य भारतातील प्रदेश हा माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. या प्रदेशाने मला खूपच आश्चर्यकारक गोष्टी दिल्या आहेत. या प्रदेशाचे सौंदर्य पाहणे म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. म्हणूनच ईशान्य भारतातील ही मोहिम आम्ही गाडीतून करण्याचे ठरवले आहे, कार्यक्रमाचे आयोजक अमेझिंग नमस्ते फाऊन्डेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
नॉर्थ-इस्ट ऑन व्हील्स ही केवळ एक मोहिम नव्हे तर एक असा प्रवास आहे ज्यामध्ये आपण त्या प्रदेशा विषयी जाणून घेऊ शकतो. अगदी काही थोडक्या महत्त्वपूर्ण गोष्टी आणि परंपरांव्यतिरिक्त ईशान्येकडे खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही. नॉर्थ-इस्ट ऑन व्हील्सच्या माध्यमातून मला असा संदेश द्यायचा आहे की यामुळे या प्रवासात लोकांना जीवनातील सर्वोत्कृष्ट अनुभव प्राप्त होऊ शकेल. मला खात्री आहे की अशा काही अनोख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन हा भागही सक्षम होऊ शकेल. पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश’ची हाक ही स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी दिली असून यातून याचा लाभ आता ईशान्य भारताला होईल अशी खात्री आहे, असे भारत सरकारच्या संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी सांगितले.