Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोरोनापासून संरक्षणासाठी आता ‘स्वयं-निर्जंतुक होणारे जैवविघटनशील मास्क’

banner

मुंबई :

कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी उद्योग जगताच्या सहकार्याने निर्जंतुक होणारे ‘तांबे आधारित नॅनोपार्टीकलचे आवरण असलेले विषाणूरोधी’ फेस मास्क तयार केले. हे मास्क कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच अन्य अनेक विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गापासूनही बचाव करण्यास उपयुक्त ठरत आहेत. संपूर्णपणे विघटित होणार्‍या घटकांपासून बनवलेले हे मास्क घातल्यानंतर श्वासोच्छवास घेण्यासही कोणताच त्रास होत नाही, तसेच हा मास्क धुता सुद्धा येणार आहे.

कोरोना श्वसन मार्गाने पसरत असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधात मास्क प्रभावी ठरत असल्याने बाजारात अतिशय महागडे मात्र विषाणूरोधी किंवा जीवाणूरोधी गुणधर्म नसलेले अनेक मास्क मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले. रुग्णालये, रेल्वे स्थानके, विमानतळे, बाजार, मॉल्स अशा गर्दीच्या ठिकाणी या कोरोनाचे संक्रमण रोखणे अतिशय कठीण आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोरोना विषाणूच्या उत्प्रेरीत स्वरूपातील नवनवे विषाणू सातत्याने आढळत आहेत. कोरोनाचे अल्फा, बीटा, मायक्रॉन हे विषाणू घातक ठरत आहेत. तर दुसरीकडे वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्याची जागतिक स्तरावर नवी समस्या निर्माण झाली आहे. पारंपरिक मास्क एकदाच वापरता येत असून, तो विघटनशीलही नाही. त्यामुळे पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी किमतीचे विषाणू रोधी तसेच विघटनशील मास्क तयार करणे अतिशय गरजे प्रकर्षाने जाणवू लागली. याची दखल घेत भारतातील शास्त्रज्ञांनी अधिकाधिक प्रभावी व विघटनशील मास्क बनवण्यासाठी संशोधन सुरू केले.

आंतरराष्ट्रीय धातू भुकटी आणि नवे घटकाचे अत्याधुनिक संशोधन केंद्र (ARCI) या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संशोधन संस्थेने पेशीविज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र संशोधन केंद्र, सीएसआरआर-सीसीएमबी आणि बंगळुरू येथील रेसिल केमिकल्स कंपनीच्या सहकार्याने ‘स्वयं-निर्जंतुक होणारे, नॅनो पार्टीकल्सचे आवरण असलेल्या विषाणूरोधी फेस मास्क’ विकसित केले आहेत. हे नवे विषाणूरोधी मास्क सुती कापडापासून बनवलेले असून ते जैवविघटनशील आहेत. त्यामुळे, त्यातून श्वासोच्छवास करणे आणि ते स्वच्छ करणेही सोपे ठरणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्कृत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नॅनो-मिशन प्रकल्पाअंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे.

Related posts

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईसाठी २२ दिवस धोकादायक

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अतिरिक्त शिक्षकांच्या हाती

Voice of Eastern

आयटीआय ऑनलाईन प्रवेश नोंदणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन लाखांचा टप्पा ओलंडला

Voice of Eastern

Leave a Comment