मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध राज्य सरकार हा सामना काही शमताना दिसत नाही आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुलुंड पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पुन्हा सोमय्या यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी विरोधात तक्रार नवघर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम सोमय्या यांनी ठेवला होता. याला मुंबई महानगरपालिका विरोध केला होता. ही कारवाई करताना अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुलुंड पोलिस आणि महानगरपालिका दोघांनीही ही गोष्ट मान्य केली आहे की त्यांच्याकडे कारवाई करण्याबाबत कोणताही कायदेशीर आदेश नव्हता असा दावा सोमय्यां यांनी केला आहे.
कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे कबूल केला आहे की त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आदेश नव्हता. आदेश नसताना बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याबरोबर कारवाईसाठी आलेल्या अधिकारी आणि अर्धा डझन गुंडा विरोधात गुन्हा दाखल करा त्याबरोबर यामध्ये सत्ताधारी पक्षाचे दोन गुंड सुद्धा होते जर मी या ठिकाणी वेळेवर पोहोचलो नसतो तर त्यांनी माझ्या कार्यालयाचे तोडफोड केली असती त्यामुळे मला सखोल चौकशी हवी असे सोमय्या यांनी सांगितले
ठाकरे सरकार ने गुंडगिरी सुरू केलेली आहे पोलिसांचा वापर हा माफिया गिरी करण्यासाठी केला जात आहे. मी ठाकरे आणि पवारांच्या माफिया गिरीला घाबरत नाही. दसऱ्याच्या वेळी माझ्या कार्यालयांमध्ये कारवाई करण्यासाठी आलेल्या इंजिनीयरला मी सोडणार नाही. त्याचा धडा मी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना शिकवणार, असा इशाराही सोमय्यांनी दिलाय.
मागील महिन्यात 19 सप्टेंबरला याचा पोलिस स्थानकामध्ये मी मला बेकायदेशीरपणे सहा तास कोंडून ठेवलं होतं अशी तक्रार केली होती मात्र आज या तक्रारीला एक महिना पूर्ण झाला आहे तरीदेखील पोलिसांनी या तक्रारीची चौकशीही केली नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी तक्रार नाकारावी किंवा एफआयआर दाखल करावा. एका महिन्याच्या आत त्याची दखल घेऊन कारवाई करायची असते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी कारवाई केली नाही, दखल घेतली नाही तर पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.