Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्येही मिळणार ॲण्टी रेबिज इंजेक्शन

banner

मुंबई :

श्वान चावल्यास घ्यावे लागणारे ॲण्टी रेबिज इंजेक्शन हे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळते. मात्र आता हे इंजेक्शन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्येही उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

भटके श्वान, मांजरी आणि माकडांनी चावा घेण्याच्या घटना वारंवार मुंबईमध्ये घडत असतात. प्राण्यांनी चावा घेतल्याने रेबिज होण्याचा धोका असतो. रेबिजकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यूही ओढावण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राण्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तीला ॲण्टी रेबिज इंजेक्शन देण्यात येते. मुंबई महानगरपालिकेने शहर व उपनगरामध्ये प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने असे १४७ केंद्रांवर हे इंजेक्कशन उपलब्ध केले आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये हे इंजेक्शन दुपारपर्यंतच मिळते. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी नागरिकांना रुग्णालयात जावे लागते. तर अनेकदा रुग्णालयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांना रुग्णालयांमध्ये धावाधाव करावी लागते. ही बाब लक्षात घेता आता मुंबई महानगरपालिकेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्येही ॲण्टी रेबिज इंजेक्शन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या दवाखानांमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्या दवाखान्यांमध्ये प्रथम हे इंजेक्शन रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

तीन वर्षांमध्ये २ लाखांपेक्षा अधिकांचे घेतले चावे

शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असून, २०२१ मध्ये ५५ हजार ५९६ लोकांचा भटक्या जनावरांनी चावा घेतला होता. तर २०२२ मध्ये ८३ हजार ३९६ आणि २०२३ मध्ये ९१ हजार ८४३ लोकांचा चावा घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक चावा हा श्वानांनी घेतला असून, त्याखालोखाल मांजर आणि माकडांनी चावे घेतले आहेत. या रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळाल्याने मागील तीन वर्षात रेबिजने एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

Related posts

वंध्यत्व जोडप्यांना दिलासा : केईएम रुग्णालयात सुरू होणार आयव्हीएफ सेंटर

हिवाळी अधिवेशनासाठी महा असेंब्ली ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ

जून ते ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना मोठा दिलासा

Leave a Comment