Voice of Eastern

मुंबई –
दोन नर्समध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने एका नर्सने रुग्णालयातील महिला सफाई कामगाराला दोन वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देण्यास सांगितले. मात्र या महिला सफाई कामगाराने १६ वर्षाच्या तरुणाचे इंजेक्शन दोन वर्षाच्या बाळाला दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोवंडीतील बैंगणवाडीमध्ये राहणारा ताह आजम खान (२) या मुलाला उलटी जुलाबचा त्रास होता. त्यामुळे १२ जानेवारीला त्याच्या आईवडिलांनी त्याला नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुसर्‍या दिवशी मुलगा बरा झाला. त्याचवेळी रुग्णालयात १६ वर्षांच्या दाखल झालेल्या रुग्णाला निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांनी औषधे आणि इंजेक्शन लिहून देत ते नर्सला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचवेळी दोन नर्समध्ये इंजेक्शन देण्यावरून वाद झाला. त्यामुळे एका नर्सने रुग्णालयातील १७ वर्षीय सफाई कामगार असलेल्या तरुणीला ते इंजेक्शन तरुणाला देण्यास सांगितले. मात्र तिने ते इंजेक्शन १६ वर्षाच्या रुग्णाऐवजी दोन वर्षाच्या बाळाला दिले. एक इंजेक्शन सलायनमधून तर दुसरे थेट टोचले. त्यामुळे काही मिनिटांतच बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेल्या इंजेक्शनचे बॉक्स घेऊन रुग्णालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांना शांत केले. त्यानंतर त्यांची तक्रार दाखल करून घेत मुलाला दिलेल्या इंजेक्शनचे नमुने तपासणीसाठी पाठवले. नमून्यांंचा अहवाल गरूवारी आल्यानंतर शिवाजी नगर पोलीसांनी रुग्णालयाचे संचालक, निवासी वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि सफाई कर्मचारी तरुणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.

Related posts

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कारवाईचे आदेश – राजेंद्र पाटील यड्रावकर

५५ वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा मंजूर

Leave a Comment