- कांजूरमार्ग
मुंबईत काही दिवसांपूर्वीच साकीनाका येथे एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आणखीन एक घटना कांजूरमार्ग येथे घडलेली आहे. सोसायटीतील वॉचमनने एका अकरा वर्षाच्या मुलीचा लैंगिक अत्याचार केला आहे. या वॉचमनला कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
कांजूरमार्ग मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे या घटनेनंतर विभागात भीतीदायक वातावरण आहे. पोलिसांनी या वॉचमन ला अटक केली असून त्याच्यावरती पोस्को आणि 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
साकीनाका येथे एका महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. या महिलेची मृत्युची झुंज अपयशी ठरली होती. या घटनेनंतर मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच कांजूरमार्ग येथील घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत खळबळ माजली आहे.