Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

ओमायक्रॉनमुळे विमानतळावर १० दिवसांत १० हजार प्रवाशांची केली आरटीपीसीआर

banner

मुंबई : 

दक्षिण आफ्रिकेसह विविध देशांंमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अतिजोखमीच्या देशातून महाराष्ट्रात येणार्‍या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या विमानतळावरच करण्यात येत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये या तिन्ही विमानतळावर १० हजारपेक्षा अधिक नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली त्यातील २५ जणांचे नमूने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राज्यामध्ये शुक्रवारी ७ रुग्ण सापडल्याने ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १०, मुंबईमध्ये पाच आणि पुणे आणि डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र परदेशातून राज्यात येणार्‍या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व स्थानिक प्रशासनासह राज्य सरकार आरटीपीसीआर चाचणी करण्यावर अधिक भर देत आहे. १ डिसेंबरपासून आतापर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तिन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगभरातून ६१ हजार ४३९ प्रवासी उतरले आहेत. यामध्ये अतिजोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांची संख्या ९६७८ तर अन्य देशातील प्रवाशांची संख्या ५१ हजार ७६१ इतकी आहे. तिन्ही विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांपैकी १० हजार ९२७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये अतिजोखमीच्या देशातून आलेल्या ९६७८ या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यातील २० जणांचे नमूने चाचणीमध्ये कोविड बाधित असल्याचे आढळून आले. या प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे का हे पडताळण्यासाठी त्यांचे नमूने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर अन्य देशातून आलेल्या ५१ हजार ७६१ प्रवाशांपैकी १२४९ प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी केली. त्यातील अवघ्या ५ जणांचे नमूने चाचणीमध्ये कोविड बाधित असल्याचे आढळून आले. या प्रवाशांचे नमूने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ४७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Related posts

कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात ७४६ उमेदवारांची नोकरीसाठी निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकविले मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी

Voice of Eastern

अनंत चतुर्दशी दिनासाठी मुंबई महानगरपालिका सुसज्ज

Leave a Comment