Voice of Eastern

मुंबई : 

राज्यात गुरुवारी १९८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या ४५० इतकी झाली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) केलेल्या चाचणीनुसार १९८ रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. राज्यात सापडलेल्या १९८ रुग्णांपैकी मुंबई १९०, ठाणे मनपा ४, सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एनआयव्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts

मुलुंड कॉलनीतील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

‘लीजेंड्स ऑफ जीएमसी’ उपक्रमामुळे  जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थ्यांना दिग्गज डॉक्टरांकडून धडे

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा

Leave a Comment