Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

३० जानेवारीला दोन मिनिटे मौन राहून हुतात्म्यादिनी पाळा

banner

मुंबई :

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळण्यात येते. यावर्षीही ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा दिन पाळण्यात यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आले आहेत.

३० जानेवारीला सकाळी ११ वाजता मौन पाळण्यास सुरुवात होईल. त्यापूर्वी सकाळी १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळावे. त्यानंतर ११ वाजून ०२ मिनिटांनी मौन संपल्याचा इशारा भोंगा पुन्हा वाजवण्यात येईल. हा भोंगा११ वाजून ०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.

भोंग्याची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी सकाळी ११ वाजता मौन पाळण्याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत. हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे, योग्य, आदराने मौन पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी, असे परिपत्रक विभागाने जारी केले.

Related posts

भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय रुग्णावर आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; कझाकस्थानच्या ९ वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा संदीप दिवे – अंबिका हरिथ विजेते

Leave a Comment