Voice of Eastern

पुणे :

मराठीतील अग्रगण्य कादंबरीकार, प्रसिद्ध दुर्गभ्रमंतीकार गो. नी. दांडेकर ज्यांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ले पाहिले, या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी ‘किल्ले, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड’ अशी नितांत सुंदर पुस्तकं लिहिली. त्यातून हजारो वाचकांना दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रातल्या डोंगर भटकंतीला एक दिशा मिळाली. गोनीदा हे फक्त किल्ले हिंडले नाहीत तर त्यांनी ते अनुभवले. त्या भग्नावशेषांच्या माध्यमातून शिवप्रभूंचा इतिहास कसा अनुभवावा याचा वस्तुपाठच गोनीदांनी घालून दिला.

गोनीदांचे हे दुर्गसंस्कार नवीन पिढीवर व्हावेत आणि गड-किल्ले मौजमजेचे स्थान नसून स्फूर्ती स्थाने आहेत. हे अधोरेखित व्हावे या उद्देशानं ‘गो. नि. दांडेकर’ यांच्या जीवनावरील ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपटाची निर्मिती ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या पुढाकाराने करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२२ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाचे महाराष्ट्रभर प्रदर्शन करण्यात येणार आहे.

‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन मिलिंद भणगे यांनी केले असून विविध प्रायोजकांच्या पाठिंब्याने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’शी संलग्न असलेल्या राज्यभरातील विविध जिल्हा संघटना व राज्यातील विविध साहसी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रभर या महितीपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या ‘लेडी रमाबाई सभागृह’ येथे जेष्ठ लेखिका वीणा देव, क्युबिक्स नेटवर्क्स प्रा. लि. चे संचालक विजय जोशी, माहितीपटाचे लेखक व दिग्दर्शक मिलिंद भणगे, माहितीपटाचे निमंत्रक निलेश देशपांडे व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांच्या उपस्थितीत ‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाचे पुण्यातील प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. हा माहितीपट पाहण्यासाठी सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

Related posts

मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा – महेश तपासे

रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित : टोपे

जागतिक रेबीज दिवस : रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे शक्य

Leave a Comment