Voice of Eastern

मुंबई :

मुंबई महापालिकेच्या मोठ्या जलवाहिनीच्या बदलण्याचे काम डॉकयार्ड रोड येथे २१ जानेवारीला हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहरातील २१ जानेवारीला सकाळी १० ते २२ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कामादरम्यान, शहर भागातील महमंद अली रोड, कुलाबा, भायखळा, माझगाव, शिवडी, परळ, सायन, माटुंगा आणि वडाळा या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि आवश्यक पाणीसाठा करण्याचे आवाहन पालिका जल अभियंता खात्याकडून करण्यात आले आहे.

भायखळा विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी आणि डॉकयार्ड मार्गालगत असलेली १४५० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम २१ जानेवारीला सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम २२ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे कुलाबा, नेव्हल डॉकयार्ड, पी. डिमेलो मार्ग, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगड झोपडपट्टी, आरबीआय, जी.पी.ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत, शहीद भगतसिंग मार्ग, तसेच बाबुला टँक झोन, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, महमंद अली मार्ग, इमामवाडा मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, नूरबाग, सॅम्युअल स्ट्रिट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रोड, उमरखाडी, डोंगरी, डॉ. महेश्वरी मार्ग, डॉकयार्ड रोड, बीपीटी, वाडी बंदर, मध्य रेल्वे यार्ड, हिंदमाता या भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Related posts

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो..! – मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा – छगन भुजबळ 

Leave a Comment