Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

यंदा दिल्लीला ट्रॉफी उंचावण्याची संधी – सुनील गावस्करांची भविष्यवाणी

banner

मुंबई :

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. तसेच त्यांचा कर्णधार रिषभ पंत हिरो ठरेल, अशी भविष्यवाणी विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी केली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी निवडलेले खेळाडू आणि त्यांनी स्वतःसाठी उभे केलेले पर्याय यामुळे हा संघ खूप मजबूत झाला आहे. त्यामुळे हा संघ स्पर्धेचा हिरो ठरण्याची आणि पहिलं जेतेपद पटकावण्याची दाट शक्यता आहे, असे समालोचक गावस्कर यांनी म्हटले आहे. रिषभ पंतने गेल्या वर्षीपर्यंत कर्णधारपदाचा घेतलेला अनुभव यंदा त्याला चांगलाच उपयोगी पडेल. त्यांला खूप आत्मविश्वासही मिळेल. गेल्या दीड वर्षांपासून त्याचा भारताच्या संघातील फॉर्मही चांगलाच सुरू आहे. हे सारं त्याच्या संघासाठी खूप उपयुक्त ठरेल, असं मत गावस्करांनी व्यक्त केले आहे.

पंजाब किंग्ज संघाला आतापर्यंत जेतेपद पटकावता आलेले नाही. या मोसमात त्यांनी फारसे विशेष क्रिकेटपटू निवडलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची कामगिरी खराब होण्याची दाट शक्यता आहे. पण याउलट, त्यांच्याकडून लोकांना कमी अपेक्षा आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत न घाबरता नवा कर्णधार मयंक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुक्तपणे खेळू शकतो, असं गावस्कर म्हणाले.
आयपीएल २०२२ मधील हंगामात एकूण १० संघ असून लखनौ आणि गुजरात हे दोन नवे संघही सामील झाले आहेत. जुन्या आठपैकी तीन संघांनी आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावलेले नाही. त्यात दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण पाच संघांना पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.

Related posts

सामानाची होळी हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा समजावा : आमदार अतुल भातखळकर

जे एन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा – आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांचे आवाहन

राज्यात ७ हजार २३१ पदांसाठी होणार पोलीस भरती – गृहमंत्री

Leave a Comment