Voice of Eastern

मुंबई : 

स्लॅपस्टिक कॉमेडीचा बादशाह अशी उपमा मिळालेला आणि घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे आता ‘कुर्रर्रर्रर्र’ हया नाटकाद्वारे पुन्हा रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘कुर्रर्रर्रर्र’ हया नाटकात पॅडी कोणत्या भूमिकेत असेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. ‘प्रग्यास क्रिएशन्स’ आणि व्ही. आर. प्रॉडकशन्स हया नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर येत आहे. अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून हास्यजत्रेत विविधांगी भूमिकेतून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

“कुर्रर्रर्रर्र” म्हणजे काय ? किंवा हया नावाचा अर्थ काय ? हा प्रश्न रसिकांना पडला असेलच. हयाचा उलगडा नंतर होईलच. मात्र हे नाटक सत्य घटनेवर आधारीत असून आई – वडील, मुलगी आणि जावई ह्यांच्या भोवती फिरणारं नाटक आहे. पंढरीनाथ कांबळे अभिनीत हे नाटक शंभर टक्के हलकी फुलकी कॉमेडी असणार हे नक्की. हया नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचं आहे. प्रसाद खांडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली पॅडीचे हे तिसरे नाटक असून ‘दिल तो बच्चा है जी’ म्हणत ‘पडद्याआड’ न राहता पॅडी प्रत्यक्ष रंगमंचावर ‘’कुर्रर्रर्रर्र’ करायला येत आहे. पॅडी आणि प्रसादचा हा धम्माल फार्स प्रेक्षकांसाठी विनोदाचा नवा हंगाम असणार आहे. हया नाटकात संगीताची जबाबदारी अमिर हडकर अणि नेपथ्यची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली आहे. नाटकाचे सूत्रधार आघाडीचे व्यवस्थापक गोट्या सावंत आहेत.

हास्यजत्रेत धुमाकुळ घालणारा, स्लॅपस्टिक कॉमेडीचा बादशाह पंढरीनाथ कांबळे रंगभूमीवर धमाल करायला येत आहे. “कुर्रर्रर्रर्र ” हे नाटक ४ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे.

Related posts

जागतिक शिक्षणाच्या प्रसारसाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाचा सेंट लुईस विद्यापीठाशी सामंजस्य करार

Voice of Eastern

मुंबई विभागात १० कनिष्ठ महाविद्यालये बंद तर पाच नवीन सुरू

Voice of Eastern

सिद्धार्थ, निम यांनी जिंकली युनिव्हर्सिटी सायक्लोथॉन

Leave a Comment