Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

रामदास पठारमध्ये लवकरच फुलणार नंदनवन – रायगड पालकमंत्री आदिती तटकरे

banner

महाड :

रामदास पठार (सुंदरमठ) येथे अनेक समस्या असल्यामुळे ग्रामस्थासह पर्यटक व भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता लवकरच रामदास पठार (सुंदरमठ) येथे नंदनवन फुलणार आहे, असे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार आदिती तटकरे यांनी दिले. रामदास पठार येथे ३४० व्या दासनवमी निमित्त आयोजित ८२ वा सप्ताह कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या.

रायगड या नावातच आपली सर्वांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असल्याचे जेव्हा मी सांगते तेव्हा माझा उर अभिमानाने भरून येतो. यातून मिळणाऱ्या ऊर्जेने दिल्लीचे तख्तही हलवण्याची ताकद मिळते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील रामदास पठार या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य राहिलेल्या रामदास पठार या तीर्थक्षेत्र स्थळी आजच्या घडीला अनेक समस्या आहेत. या तीर्थस्थळी येताना चांगला रस्ता नसल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होत नाही. तसेच पाणी व अन्यसोयी सुविधा नसल्यानेही त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रामदास पठारला येणारे भाविक आणि ग्रामस्थ यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मी स्वतः सरकार दरबारी प्रस्ताव सादर करेल. चांगल्या सोयीसुविधांबरोबरच गावाचा विकास आणि त्याचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगत आदिती तटकरे यांनी गावातील ऐतिहासिक विहिरीची पुनर्बांधणी करण्याबरोबरच तलाव बांधण्याचा संकल्प सोडला. हा तलाव बांधताना त्याचे सुशोभीकरण करून त्याच्या परिसरात भाविकांना शांतपणे बसता येईल याची व्यवस्था करण्यात येईल, रामदास पठारकडे येणारा रस्ता चांगला असला तरी काही ठिकाणी तो फारच खराब झाला आहे. त्याची दुरुस्तीकरण्यात येईल. पुढील सप्ताहापर्यंत ही सर्व कामे सुरू झालेली असतील, असे सांगत आदिती तटकरे यांनी रामदास पठार गावाचा लवकरच विकास होईल असे ठोस आश्वासन दिले.

रामदास पठार (सुंदरमठ) येथे बांधण्यात आलेल्या भोजन मंडपाचे उदघाटन तसेच समर्थांच्या मूर्तीवर आदिती तटकरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. गावातील विकासासाठी व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात श्री गणेशनाथ महाराज संस्थान व दासबोधाचे विशेष संशोधित जन्मस्थान ‘शिवथर घळ’चे संशोधक अरविंदनाथ महाराज यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Related posts

खोपट एसटी आगारात गर्दुल्यांचे बस्तान; बस स्थानक प्रमुखावर केली दगडफेक

महिला कुस्तीगिरांच्या समर्थनार्थ छात्रभारतीची दादर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने

२४, २५ मार्चला विक्रोळीमध्ये पाणीपुरवठा बंद

Voice of Eastern

Leave a Comment