मुंबई :
मुंबईत नाताळ आणि ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. त्यातच कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पार्ट्या, कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
ओमायक्रॉनची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत शुक्रवारी सरकारने नवे निर्बंध लागू केले. सर्व प्रकारच्या समारंभांवर निर्बंध लागू केले. स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुसार निर्बंध कडक करण्याचे अधिकार दिले आहेत. नववर्षानिमित्त विविध पार्टी, कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा परिस्थितीत नागरिक एकत्र आल्यास कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विषाणू रोखण्यासाठी थर्टीफर्स्ट निमित्त आयोजित कार्यक्रम, पार्ट्या तसेच एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.