Voice of Eastern

मुंबई :

हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने एक प्रवासी फलाट आणि गाडीमधील मोकळ्या जागेत सापडला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत तातडीने त्या प्रवाशाच्या दिशेने धाव घेत त्याचे प्राण वाचवले. रेल्वे स्थानकांवर घडलेली ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चित्रित झाली आहे.

वडाळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर रविवारी दुपारी १२ वाजता धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा तोल गेला. त्याचवेळी तो लोकलच्या दरवाजामध्ये अडकून फरफटत जात होता. त्याचवेळी कर्तव्यावर असलेला आरपीएफ जवान नेत्रपाल सिंह यांनी प्रवासी फरपटत जात असल्याचे पाहून लोकलच्या दिशेने धाव घेतली. लोकल व फलाटामधील जागेतून लोकल खाली जात असलेल्या प्रवाशाला त्याने मागे ओढून त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली. आरपीएफ जवान नेत्रपाल सिंहचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, धावती लोकल पकडू नये असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

आयडॉलचे पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून 

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात बाधक ३५ अतिक्रमणे हटवली; अतिक्रमणे हटविल्याने उड्डाणपुलासाठी जागा उपलब्ध

सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ५ हजार ७८६ मेट्रिक टन कचरा, राडारोडा संकलित

Leave a Comment