Voice of Eastern

मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून सुधारीत वेळापत्रक विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार मानव्यविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबरला, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबरला तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा २१ डिसेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार्‍या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. पेट परीक्षेला बसणार्‍या सर्व परीक्षार्थींनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

Related posts

राज्य कबड्डी निवड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरचा पराभव

मुंबई विद्यापीठाच्या अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा १८ व १९ जुलैला होणार

Voice of Eastern

ठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’- नारायण राणे

Leave a Comment