Voice of Eastern
मोठी बातमीशहर

पेट्रोलचे दर वाढतेच, आता करायचं काय सर्वसामान्याना प्रश्न

banner

मुंबई

 

पेट्रोल आणि डिझेलचे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. भेटून आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहे.सरकारी तेल कंपन्यांनी  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आह. यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 106. 19 पैसे तर डिझेलचा दर 94.92 पैसे इतका झाला आहे. पेट्रोलच्या मागोमाग आता डिझेलनेही मुंबईमध्ये शंभरी ओलांडली आहे. मुंबईत डिझेलने शंभरी ओलांडली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 112. 11 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर डिझेलचा दर 102. 89 रुपये इतका झाला आहे.

फक्त ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.50 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 4.70 रुपयांनी वाढले आहे.

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खूप मोठी वाढ झालेली आहे. विरोधकांनीही हा विषय धरून ठेवला होता मात्र त्याचा काहीही फायदा झाल्याचे दिसत नाही आणि पेट्रोलचे दर वाढतच आहेत. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

 

चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली पेट्रोल 106. 19 रुपये आणि डिझेल 94.92 रुपये प्रति लीटर

मुंबई पेट्रोल 112. 11 रुपये आणि डिझेल 102. 89 रुपये प्रति लीटर

चेन्नई पेट्रोल 103.31 रुपये आणि डिझेल 99.26 रुपये प्रति लीटर

कोलकाता पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 98.03 रुपये प्रति लीटर

कोणत्या राज्यात 100 पार

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा कर्नाटक, लडाख, जम्मू काश्मीर या भागामध्ये पेट्रोल ने शंभरी पार केली आहे. सगळ्यात जास्त दर हे मुंबईमध्ये आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो.

Related posts

थायरॉईड आय डिसीजला वेळीच प्रतिबंध करा

राष्ट्रीय विज्ञान दिन : स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले भरड धान्याचे पदार्थ

‘इंद्रधनुष्य २०२३’मध्ये २ हजारांहून अधिक विद्यार्थी करणार कला आणि क्रीडा सादरीकरण

Voice of Eastern

Leave a Comment