Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

२६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा फोटो काढणार फोटोग्राफर सरकारी दरबारी बेदखल

banner

मुंबई :

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याला शनिवारी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्याचा फास्ट ट्रॅकवर खटला चालवून प्रमुख दहशतवादी अजमल कसाबला चार वर्षांतच फासावर लटकवले गेले. दहशतवादी लढ्यातील भारताच्या या धडाकेबाज कामगिरीचे जगभर कौतुक झाले, पण खटल्यात प्रमुख पुरावा ठरलेला कसाबचा फोटो टिपणारा फोटोग्राफर सेबॅस्टीयन डिसोझा मात्र राज्य सरकारच्या नजरेतून अद्यापही दुर्लक्षित दुर्लक्षित राहिला आहे. सरकारने घराचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे डिसोझा यांची घरासाठीची घरघर सुरू आहे. मागील १४ वर्षांपासून डिसाेझा हक्काच्या घराकरीता सरकार दरबारी खेटे घालत आहे. उतारवयात तरीही न्याय मिळेल का? असा सवाल डिसाेझा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. हक्काचे घर मिळण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहारही केला असल्याचे सांगितले.

सेबॅस्टीयन बर्नड डिसाेझा मागील ३५ वर्षांपासून छायािचत्रकार म्हणून विविध वर्तमानपत्रात कार्यरत हाेते. सध्या ते सेवािनवृत्त आहेत. २६ नाेव्हेंबर २००८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अजमल कसाब व अबु इस्माईल या दाेन दहशवाद्यांचे छायािचत्र टिपणारे सेबॅस्टीयन बर्नड डिसाेझा हे एकमेव छायािचत्रकार हाेते. त्यांनी टिपलेल्या अजमल कसाबचे छायाचित्र जगभरातील वृत्तपत्रांनी दखल घेत पहिल्या पानावर प्रसारित करण्यात आले. कसाबला दाेषी ठरविण्यासाठी संबंधित छायाचित्राने महत्वाची भूमिका बजावली हाेती. त्यामुळेच न्यायालयाने कसाबला दाेषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली हाेती. याशिवाय घटनास्थळाचा मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला हाेता. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी जुलै २०१० मध्ये ठाण्यात दुर्बल घटकांसाठी असलेल्या गृहनिर्माण याेजनेत घर देण्याचे आश्वासन दिले. पण १४ वर्ष उलटूनही अद्यापही घर मिळाले नसल्याची खंत डिसाेझा यांनी व्यक्त केली.

घर मिळण्यास आडकाठी का?

कसाबची ओळख पटावी म्हणून महत्वाची भूमिका बजावण्याने छायाचित्राची दखल घेत सरकारकडून गाैरव करण्यात आला हाेता. यािशवाय माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी जुलै २०१० मध्ये ठाण्यात दुर्बल घटकांसाठी असलेल्या नगरविकास व गृहनिर्माण याेजनेतंर्गत शासनाने छायािचत्रकार या प्रवर्गातून घर देण्यात आले होते. ठाण्यातील घाेडबंदर राेड येथील प्राईड पार्कच्या ॲहजिलेका प्राईडमध्ये बी विंगमधील १०२ क्रमांची सदनिका त्यांना मिळाली होती. त्यानुसार घरासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली. मात्र दुर्देवाने जमीन मालक गिरीश दमानिया व मे. हेम, बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे मालक कुणाल प्रवीणचंद्र यांच्यामध्ये वाद झाला . हा वाद उच्च न्यायालयात गेल्याने अजूनही सेबॅस्टीयन बर्नड डिसाेझा हे घरापासून वंचित राहिले आहेत.

७३ व्या वर्षीही भाड्याच्या घराचा आसरा

माझे ७३ वर्षे असून सेवािनवृत्त झालाे आहे. याशिवाय सध्या विविध आजारांनी त्रस्त आहे. ज्यामुळे कुठेही काम करणे शक्य नाही. मुंबईत स्वत:चे घर नसल्याने सध्या भाड्याच्या घरात राहत आहे. पण भाडे ही परवडत नसल्याने मी पत्नीच्या गावी गाेवा येथे राहत आहे. घर मिळावे म्हणून मागील काही वर्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय विविध राजकीय नेत्यांकडे पत्रव्यवहार केला. पण प्रत्येकाने केवळ आश्वासन देऊन बाेळवण केली. ठाणे येथील प्राईड पार्क येथील वाद अजूनही सुरु आहे. हा वाद संपुष्टात येण्यास अजून किती वर्ष जातील याची कल्पना नाही, त्यामुळे अन्यत्र कुठेही घर मिळावे, असेही सरकार दरबार मी कळवले होते. पण त्याकडेही कानाडाेळा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष देऊन मला न्याय द्यावा, अशी विनंती सेबॅस्टीयन बर्नड डिसाेझा यांनी केली आहे.

Related posts

देवीच्या १० स्वरूपांचे दर्शन घडवणारे जीएसबी मंडळ

Voice of Eastern

महाराष्ट्रात उभारणार ३१७ चार्जिंग केंद्र 

Voice of Eastern

मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे कठीण

Leave a Comment