सिंधुदूर्ग :
Uiआंबोलीत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण अल्हाददायक झालेला पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन पूर्णपणे बंद असलं तरी देखील सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काही पर्यटकांना आंबोली पोलीस पुन्हा परतून लावतात तर काही पर्यटकांवर कारवाई करताना पहायला मिळत आहे.
अनेक पर्यटक आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ जाऊन पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. मात्र, पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे पर्यटन व्यवसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. असं असताना पर्यटन व्यवसायिक एक जुलैपासून पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत.