मुंबई :
मुंबई मेट्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या `माझी मेट्रो – रंग दे मेट्रो ‘ या स्पर्धेत भारताच्या १२ राज्यातील तसेच विदेशातून ३४०० हून स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटातील या स्पर्धेत सर्वात लहान स्पर्धक असलेल्या १४ वर्षीय वेदांत शिंदे याच्या `स्पिरिट ऑफ मुंबईट या चित्राला विशेष पारितोषिक मिळाले असून त्याचे चित्र मुंबई मेट्रोच्या एका स्थानकावर रंगविले जाणार आहे.

त्याने यापूर्वी मुंबई महानगरपालिका तसेच बंगळुरू येथील मेजर अक्षय गिरीश मेमोरियल ट्रस्टच्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील पारितोषिक प्राप्त केले आहे. उत्कृष्ट ३० चित्रांचे प्रदर्शन सध्या मुंबईच्या घाटकोपर मेट्रो स्थानकावर भरविण्यात आले असून त्यात या चित्राचा समावेश आहे.