Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर नियोजन करा

banner

मुंबई :

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व तयारीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, दूरदृश्य प्रणालीव्दारे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे उपायुक्त रोशन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त मनोज रानडे, पोद्दार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल, रेल्वेचे राकेश कुमार गुप्ता, मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही. त्यामुळे यावर्षी त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त देशभरातील अनुयायी चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यावेळी अनुयायींना कोणताही त्रास होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या. पोलीस, महापालिका यांनी दक्ष राहावे. अनुयायी मोठ्या संख्येने येणार असल्याने त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपली तयारी करून चोखपणे काम करावे. कोविड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला, तरी खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाची इमारत दुरुस्ती करू किंवा पर्यायी जागा देऊ – चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

Voice of Eastern

पर्यटन संचालनालयामार्फत पुण्यातील जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

२७ व २८ मे २०२३ रोजी होणार मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Leave a Comment