Voice of Eastern
मनोरंजनमोठी बातमी

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारात नवरत्नांचा सहभाग

banner

नवरात्र म्हणजे देवीचा, स्त्री शक्तीचा जागर, नवरात्र म्हणजे नवरंगांचा,सकारात्मकतेचा उत्सव. हा नवरात्रोत्सव अधिकच उत्साही बनवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये नवरत्नांचा सहभाग होत आहे. यापूर्वी ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव या तारेतारकांचा समावेश झाला आहे. आता यात आणखी नऊ रत्ने सहभागी होणार आहेत. या नऊ तारका कोण असतील, हे नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला कळणार आहे.

‘प्लॅनेट टॅलेंट’च्या परिवारात सहभागी झालेल्या या नवरत्नांबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की, या नऊ तारका आमच्या परिवारात सहभागी होत आहेत आणि यासाठी नवरात्रीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. या आधीही ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये अनेक नामवंत तारेतारका सहभागी झाले आहेत. त्याचा फायदा साहजिकच त्यांच्यासह आम्हा सर्वांनाच होत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सहभागी होणाऱ्या या तारकांनीही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि ‘प्लॅनेट मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्या यशाची एक आणखी पायरी चढतील, याची आम्हाला खात्री आहे. आता नव्याने सहभागी होणारे हे नऊ रंग कोणते असतील, हे लवकरच कळेल.”

Related posts

महिला दिनी महाराष्ट्रातल्या तीन महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार’

गिर्यारोहक उमेश झिरपे यांना ’महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्कार प्रदान

Voice of Eastern

मुंबईत १ लाखांमध्ये ९,२३१ संशयित मधुमेही

Voice of Eastern

Leave a Comment