Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

उल्हासनगरमध्ये पहाटेपर्यंत चालणाऱ्या डान्सबारवर पोलिसांची कारवाई ; ५० बारबालांसह ७८ ग्राहक ताब्यात

banner

उल्हासनगर :

ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलिसांनी रविवारी पहाटे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे पहाटेपर्यंत चालणाऱ्या तीन डान्स बारवर छापा मारून ५० बारबाला आणि ७८ ग्राहकांना ताब्यात घेतले. या सर्वांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलिसांच्या या कारवाईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अडचणीत आले असल्याचे समजते

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम चौकात वादग्रस्त ॲपल डान्स बार तसेच १०० डेज आणि ९० डेज हे डान्स बार राजरोसपणे सुरु आहेत. हे सर्व डान्स बार उल्हासनगर उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस आणि राजकीय पुढऱ्यांच्या छत्रछायेखाली पहाटे पाच वाजेपर्यंत बिंदासपणे चालत असून या तिन्ही डान्स बार बाबत पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागात तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु या तक्रारीनंतर या डान्स बारवर कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा रोष होता. उघडपणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲपलडान्स बार, १०० डेज आणि ९० डेज या तिन्ही वादग्रस्त बारमध्ये नेहमी उशिरा रात्री मारहाणीचे प्रकार घडतात. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नुकताच आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच त्यांनी सर्व प्रथम रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या डान्स बार आणि मटका जुगाराच्या अड्डयावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशातंर्गत अतिरिक्त आयुक्त दत्तात्र्य शिंदे यांच्या सूचनेनुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या तिन्ही डान्स बारवर कारवाई करून ५० बारबाला आणि ७८ ग्राहकांना ताब्यात घेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे समजते.

Related posts

खोकल्याच्या औषध विक्रीत ४० टक्क्यांनी घट

शिवनेरी क्रिडा मंडळ जयदत्‍तगुरू चषकाचा मानकरी

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Voice of Eastern

Leave a Comment