मुंबई :
कामाचे स्वरुप आणि व्याप यामुळे पोलिसांवर पडणारा ताण यामुळे पोलिसांची १२ दिवसांची किरकोळ रजा २० दिवस करण्यात आली आहे. या निर्णयाला गृह विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिली.
महिला पोलीस अंमलदारांना ८ तासांची ड्युटी करण्याच्या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. ८ तास केलेल्या ड्यूटीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांना दर्जेदार आणि कॅशलेस आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ३४७ दवाखान्यांची यादी तयार झाली आहे. या दवाखान्यांची संख्या कमी पडत असल्यास ते वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल. आगामी पोलीस भरतीमध्ये महिला आरक्षण ठेवून ती पदे भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल.