Voice of Eastern

मुंबई :

२०१९ मधील पोलीस भरतीमधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यात पोलीसांनी उत्तम कामगिरी केली असून ’२०२० या वर्षातील गुन्हे’ (Crime in २०२०) अहवालानुसार राज्यात ३ लाख ९४ हजार १७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात महाराष्ट्र देशात अकराव्या क्रमाकांवर आहे. महिलांच्या संरक्षणासाठी असलेले शक्ती विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपतींकडे गेले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर राज्यात एक चांगला कायदा अस्तित्वात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्यासाठी असलेली १५ वर्षांची अट कमी करून ती १२ वर्षांवर केली आहे. कोरोनामधील पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करुन ३९४ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस भरती २०१९ मधील रिक्त ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातील निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका दिल्या जातील. तसेच ७ हजार २३१ पदांच्या भरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, लवकरच ही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा – जयंत पाटील

महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य – डॉ नीलम गोऱ्हे

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात १० कोटींहून अधिक शौचालये

Leave a Comment