Voice of Eastern

मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पूर्व परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पात्र ठरलेल्या या उमेदवाराची मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ हा २२ जानेवारी २०२२व पेपर क्रमांक २ दिनांक २९ जानेवारी, २०२२ रोजी होणार आहे.

सप्टेंबर मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

Related posts

अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी – खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता

Voice of Eastern

कूपर रुग्णालयात अर्धांगवायूग्रस्त दोन रुग्णांवर चार तासांत यशस्वी शस्त्रक्रिया

Voice of Eastern

Leave a Comment