Voice of Eastern

मुंबई :

सामाजिक जाणिवेचं भान राखून बनवलेले चित्रपट नेहमीच प्रेक्षक व समीक्षकांच्याही पसंतीस पडतात. अशाच चित्रपटांचा वारसा सांगणारा ‘आश्रय’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आश्रय’चे पहिलं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले, त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत आणि अभिषेक संजय फडे निर्मित ‘आश्रय’चे लक्ष वेधून घेणारे पोस्टर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, चेअरमन शिवामृत दूध उत्पादक संघ शंकरनगर अकलूज, सोलापूर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील व पंचायत समिती सदस्य अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.

रमेश ननावरे आणि संतोष कापसे यांनी दिग्दर्शन केलं आहे. ‘आश्रय’मध्ये एका अनाथ लहान जीवाची कथा आहे. स्वबळावर, कर्तृत्वावर, मेहनतीने पुढं जाण्याची उर्मी असणाऱ्या तरुणाईला प्रेरणादायी ठरावी अशी गोष्ट आहे. यात अमेय बर्वे, सुनील गोडबोले, निशिगंधा वाड, श्वेता पगार, दीपाली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अभिषेक फडे यांची तर, दीक्षित सरवदे यांचे संवाद आहेत. सिनेमॅटोग्राफी प्रथमेश शिर्के आणि डिओपी राजू देशमुख यांनी  केली आहे. संकलन प्रदीप पांचाळ यांचं आहे. संगीत दिग्दर्शन विशाल बुरुडकर, तर अनिकेत जैन यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. आरती फडे यांनी लिहिलेली गाणी आनंद शिंदे, ऋषिकेष रानडे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Related posts

कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करणार – मुख्यमंत्र्यांचा मच्छीमारांना दिलासा 

Voice of Eastern

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात

भारत व वेस्‍टइंडिजमधील १००व्‍या कसोटी सामन्‍यासाठी सायकल अगरबत्ती शीर्षक प्रायोजक

Leave a Comment