Voice of Eastern

मुंबई :

बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरचा ‘मुजीब-द मेकिंग ऑफ ए नेशन’ या दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दृकश्राव्य सह निर्मिती करारांतर्गत बंगबंधूच्या जीवनावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बंगबंधूच्या शतकमहोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमात भारत आणि बांगलादेश यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याची घोषणा केली होती. शतक महोत्सवी कार्यक्रमाची सांगता होत असताना चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्याने त्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. शेख मुजीबूर रहमान यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणणे ही एक अवघड कामगिरी होती. ‘मुजीब- द मेकिंग ऑफ अ नेशन’ हा चित्रपट माझ्यासाठी भावनिक आहे, आम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्व चित्रित करताना कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. मुजीब भारताचे अतिशय जवळचे मित्र होते, असे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी सांगितले.

मुजीब हा चित्रपट एनएफडीसीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा चित्रपट आहे. यासाठी पुन्हा एकदा श्याम बेनगलजींसोबत संस्थेचा संबंध येणे हा अनुभव आनंददायी आहे. या चित्रपटासाठी बीएफडीसीला सोबत घेण्याचा अनुभवही चांगला असल्याचे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर म्हणाले. सूर्यप्रकाशाचा साक्षीदार असलेला चित्रपट पाहून मी भारावले आहे. ‘मुजीब – द मेकिंग ऑफ ए नेशन’ ही आपल्यासाठी एक भावना आहे. श्याम बेनेगल जी यांचा हा चित्रपट पाहण्याची बांगलादेश आतुरतेने वाट पाहत असल्याचे बांगलादेश चित्रपट विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नुझहत येस्मिन म्हणाल्या.

मुजीब यांची भूमिका साकारणे हे एक स्वप्न होते आणि ते सत्यात उतरले आहे. माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी हा चित्रपट किती मोठा आहे हे व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. भारतात चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मला प्रेमळपणा आणि उत्तम आदरातिथ्य मिळाले. मी या भूमिकेला न्याय दिला आहे. बंगबंधूंवर लोक जसे प्रेम करतात तसे ते या चित्रपटावरही करतील. शेख मुजीबुर रहमानची भूमिका साकारणारे अभिनेते अरीफिन शुवो यांनी सांगितले.

Related posts

आयटीआय प्रवेशाची विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबरपर्यंत आणखी एक संधी

Voice of Eastern

‘महास्वयंम’द्वारे डिसेंबरमध्ये ४५ हजार बेरोजगारांना नोकरी

Voice of Eastern

नवीन ग्रंथालय इमारत मार्च अखेरीस होणार सुरू; मुंबई विद्यापीठाची माहिती

Leave a Comment