Voice of Eastern

चेंबूरमध्ये झाला पावडर फॉल; नागरिकांमध्ये घबराट. अधिक माहितीसाठी वाचा ही सविस्तर बातमी.

मुंबई

मुंबईतील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून चेंबूरचे नाव घेतले जाते. या चेंबूरमधील नागरिकांना शनिवारी रात्री थेट स्नो फॉलचा अनुभव आला. मात्र अल्पावधीतच हा स्नो फॉल नसून पावडर फॉल असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आाहे. चेंबूर पोलिसांनी पावडरसदृश घटक तपसाणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाण गावातील नागरिक शनिवारी दत्तजयंतीचा उत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. जयंतीनिमित्त भंडार्‍याचे आयोजन केले होते. त्याचवेळी आकाशातून सफेद रंगाचे पावडरसदृश्य काहीतरी पडण्यास सुरुवात झाली. सुरुवातील वाढत्या थंडीमुळे स्नो फॉल होत असल्याचे अंदाज नागरिकांनी लावला. गव्हाण गावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाक्यांवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला. मात्र हा पांढरा थर स्नो फॉल नसून पावडर असल्याने नागरिकांच्या लक्षात आले आणि त्यांच्यामध्ये घबराट पसरली. भंडार्‍यावेळी जेवत असलेल्या भाविकांच्या जेवणात पांढर्‍या रंगाची पावडर पडल्याने शरीरास धोका निर्माण होईल, या शंकेने ते अधिकच घाबरले. दरम्यान, भयभीत झालेल्या नागरिकांनी लगेचच पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक नगरसेवक, पालिकेने या सगळ्याची प्राथमिक पाहणी केली असता सत्य उघडकीस आले.

चेंबूरमधील एचपीसीएलच्या एका प्लांटमधून शनिवारी रात्री कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे या परिसरात पावडर फ्लो झाल्याचे उघडकीस आले. ही पावडर विषारी नसल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली. तरीही खबरदारी म्हणून या पावडरची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. गळतीबाबत हलगर्जीपणा झाला असल्यास कंपनीवर कायदेशीवर कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts

सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कामा रुग्णालयात छोट्या स्वरुपातील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होणार; रुग्णांना मिळणार दिलासा

मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा – अनिल बोरनारे

Leave a Comment