मुंबई :
परभणी येथे होणाऱ्या ‘६८व्या राष्ट्रीय महिला गट’ कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला २२ जणांचा चमू जाहीर केला. या निवडण्यात आलेल्या महिला संघाचे सराव शिबीर संघ प्रशिक्षिका शैलाजा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जानेवारीपासून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे घेण्यात आले आहे.
सराव शिबिरातून महाराष्ट्राच्या १२ जणांचा संघ निवडण्यात येऊन हा संघ परभणी येथे होणाऱ्या “६८व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाचे प्रतिनिधीत्व करेल. परभणी येथे नुकत्याच झालेल्या महिला गट राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या या २२ खेळाडूंनी ३ जानेवारीला दुपारी ११ वाजेपर्यंत शिबिरा ठिकाणी उपस्थित रहावे असे एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.