Voice of Eastern

मुंबई : 

आज भल्याभल्यांना भारतीय सिनसृष्टीनं अक्षरश: वेड लावलं आहे. अशातच प्रादेषिक सिनेसृष्टींमध्ये दिवसेंदिवस मराठीचं वर्चस्व वाढत असल्यानं बऱ्याच कलावंतांसोबत डान्सर्सनाही जणू मराठी सिनेसृष्टी खुणावत आहे. हिंदी सिनेसृष्टीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनची पावलंही मराठीच्या दिशेनं वळली आहेत. पदार्पणातच तिनं ‘एक नंबर’ धमाल नाचो साँगवर परफॅार्म करत तमाम रसिकांना घायाळ करण्याची योजना आखली आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक नंबर…सुपर’ या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश परबसोबत एलेनाचा धमाल डान्स परफॅार्मंस पहायला मिळणार आहे.

लक्ष वेधून घेत उत्सुकता वाढवणारं ‘एक नंबर…सुपर’ असं टायटल असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार असून, एलेनासोबत नाचतानाही दिसणार आहे. ‘एक नंबर…सुपर’ या चित्रपटातील ‘माझे तुकडे तुकडे व्हतील गं…’ असा मुखडा असलेल्या गाण्यावर एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज परफॅार्मंस प्रेक्षकांना पहायला मिळणार असून राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एलेनानं प्रथमच मराठी चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एलेनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. एलेना-प्रथमेशवर शूट करण्यात आलेलं गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून, वरुण लिखते, मुग्धा कऱ्हाडे आणि कविता राम यांनी गायलं आहे. वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. एलेना ही रशियातील प्रसिद्ध डान्सर आहे. परदेशासोबतच भारतातही तिचे खूप चाहते आहेत. जबरदस्त लुक, आकर्षक डान्स, लक्षवेधी देहबोली, गोड स्मित, हॉट व्यक्तिमत्व आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी एलेना यु ट्यूबवर खूप पॅाप्युलर आहे. ‘एक नंबर…सुपर’ चित्रपटातील गाण्यात प्रथमेशसोबत तिच्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘एक नंबर…सुपर’ मधील ‘बाबूराव झाला…’ हे गाणं यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, आता ‘माझे तुकडे तुकडे व्हतील गं…’ हे गाणं धमाल करण्यासाठी सज्ज झालं आहे. या गाण्यासाठी एलेनाची निवड करण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायला आवडतं. ‘माझे तुकडे तुकडे व्हतील गं…’ या गाण्यासाठी एलेनाची निवडही याच विचारातून करण्यात आली आहे. या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका पॅाप्युलर डान्सरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री झाली आहे. वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून, त्यावर बांधलेली चाल त्याही पेक्षा सुरेख असून अबालवृद्धांना थिरकायला लावणारी आहे. नेहमीप्रमाणे ‘एक नंबर…सुपर’च्या माध्यमातून प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद कवडे यांनीच चित्रपटाची कथा व पटकथाही लिहिली असून, संजय नवगिरे यांनी संवादलेखन केलं आहे. या प्रथमेशसोबत मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, प्रणव पटेल यांनी संकलन केलं आहे. संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी पटकथा सहाय्यक म्हणून काम पाहिलं असून, हजरत शेख (वली) यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

Related posts

नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत; उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेणार भेट

Voice of Eastern

शेन वॉटनस दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

नवनिर्माण विज्ञान प्रबोधनला आंतरराष्ट्रीय ISO मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

Leave a Comment