Voice of Eastern

मुंबई : 

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) फिरण्यासाठी येणार्‍या गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आता इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा सोमवारपासून सुरू होणार असल्याने याचा त्यांना मोठा फायदा होणा आहे. मात्र ही सुविधा ठरावीक अंतरासाठी असणार आहे.

मुंबईमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा नॅशनल पार्कला नक्कीच भेट देतो. यामध्ये देशविदेशातील पर्यटकांचा समावेश असतो. पर्यटकांना नॅशनल पार्कची सफर करण्याचा आनंद लुटता यावा यासाठी प्रशासनाकडून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. तसेच त्यांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यावर भर दिला जातो. नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना बंदी असल्याने वृद्धांना फेरफटका मारणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे आता गर्भवती महिला, वृद्ध यांना पार्कातील सफरीचा आनंद घेता यावा यासाठी उद्यान ते वनराणीतील एक किलोमीटर जागेसाठी त्यांना इलेक्ट्रीक वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्यानातील इतर भागांत फेरीसाठी चालतच फेरफटका मारावा लागणार आहे. उद्यानातील व्याघ्र आणि सिंह सफारीसाठी वनराणी ते सफारीपर्यंत एक किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागणार आहे, अशी माहिती नॅशनल पॉर्कच्या अधिकार्‍यांनी दिली. राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते या सुविधेचे अनावरण करण्यात आले. रॉटरी क्लबने सीएसआर निधीतून ही वाहने उपलब्ध केली आहेत. एका वाहनात पाच ते सहाच प्रवासी बसण्याची व्यवस्था असणार आहे. ही सुविधा सोमवारपासून विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

Related posts

‘गडद अंधार’चे संगीत व ट्रेलर रसिकांच्या भेटीला

कोरोनाचे संकट दूर करण्याचे विक्रोळीकरांचे भगवान शंकराला साकडे

Voice of Eastern

काश्मीर फाइल्सचे मोफत प्रदर्शनाला दादरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Voice of Eastern

Leave a Comment