Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबईतील मुख्याध्यापकांना मिळणार ‘स्टार्स’चे प्रमाणपत्र; अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

banner

मुंबई :

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बळकट करण्याच्या संदर्भात मुंबईसह राज्यातील मुख्याध्यापकांचे ऑनलाईन प्रशिक्षण होऊनही शासनाकडून मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र मिळत नव्हती अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केल्याने लवकरच सर्व मुख्याध्यापकांना स्टार्सचे प्रमाणपत्र मिळणार आहेत.

राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्रशासन पुरस्कृत स्टार्स Strengthening Teaching – Learning and Results for States (STARS) या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, शासकीय अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा, समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या शाळा ) शाळांमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्यांचे Infosys Springboard या संगणक प्रणालीच्या माध्यमातून Online प्रशिक्षण महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था यांनी आयोजित केले होते
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापकांना संस्थेने प्रमाणपत्र देणे आवश्यक होते याबाबत मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांनी अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या

अनिल बोरनारे यांनी संबंधित संस्थेकडे दि ३ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन तातडीने मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती अखेर महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या संचालकांनी अनिल बोरनारे यांना मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करीत असल्याचे दि ९ ऑक्टोबर रोजी अनिल बोरनारे यांना लेखी पत्र दिले त्यामुळे लवकरच मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

Related posts

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम : मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

पावसामुळे रायगडमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई

Leave a Comment