Voice of Eastern
ताज्या बातम्यामनोरंजनमोठी बातमी

‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ची पदार्पणातच तीन दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती

banner

मुंबई : 

‘भगवान बचाए…’ या लोकप्रिय गाण्याच्या निर्मिती-दिग्दर्शनासोबतच ‘फूटफेअरी’ आणि ‘सूर लागू दे’ (मराठी) या चित्रपटांचे सह-निर्माते आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक अरविंद सिंग राजपूत यांनी ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ ही स्वतःची नवी कोरी कंपनी नुकतीच लाँच केली आहे. ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ची प्रस्तुती असलेले तीन पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये सिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहेत.

यापूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘झेंडा’, ‘बॉईज’, ‘टकाटक’ आणि इतर अनेक सुपरहिट चित्रपटांचं यशस्वी वितरण करणाऱ्या ‘पिकल एंटरटेनमेंट’च्या माध्यमातून ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ची प्रस्तुती असलेले चित्रपट सर्वत्र वितरित केले जाणार आहेत. ‘रघुवीर’, ‘होय महाराजा’ आणि ‘अम्ब्रेला’ या बहुप्रतिक्षीत दर्जेदार चित्रपटांसोबत ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या मराठी चित्रपटांना सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट आणि पिकल एंटरटेन्मेंट मदतीचा हात पुढे करणार आहेत.

याविषयी बोलताना ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’चे अरविंद सिंग राजपूत म्हणाले, “पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये तीन महत्त्वपूर्ण मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने आम्ही खूप उत्सुक आहोत. ही केवळ सुरुवात आहे. सिनेमे प्रस्तुतकर्त्यांच्या रूपात आशयघन चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यावर आमचा विश्वास आहे. दीर्घ खेळी खेळण्याच्या निश्चयाने ‘सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट’ मैदानात उतरली आहे. २०२३च्या अखेरपर्यंत हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये १० चित्रपट प्रदर्शित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”


हेही वाचा : एसएनडीटी महिला विद्यापीठात युवाकवींच्या काव्यप्रतिभेचा ‘नवंकोरं’ कार्यक्रम

Related posts

आरटीई प्रवेशासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

‘स्वदेशी तुझे सलाम’ला पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सन्मान

नवीन ग्रंथालय इमारत मार्च अखेरीस होणार सुरू; मुंबई विद्यापीठाची माहिती

Leave a Comment