Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

५०० फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफीची १ जानेवारीपासून अंमलबजावणी

banner

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी २०२२ रोजी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ४६.४५ चौ.मी. (५०० चौरस फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची १ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील १६.१४ लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे ४१७ कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे ४५ कोटी असा एकूण ४६२ कोटींचा महसूल कमी होणार आहे.

Related posts

ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुटी

भूगर्भीय बदलांवर ‘दगड’ प्रदर्शनातून टाकला प्रकाश

सत्य घटनेवर आधारीत ‘आवर्त’ रंगभूमीवर

Leave a Comment