Voice of Eastern

मुंबई : 

बारावीच्या निकालानंतरही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) परीक्षेला विलंब झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. मात्र आता परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही उच्च शिक्षणांतर्गत येणार्‍या विधी तीन वर्षे, विधी पाच वर्षे आणि बी.एड.एम.एड, बी.पी.एड, एम.एड, बी.ए. बी.एस्सी.बी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने या परीक्षा दिलेले ८४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी तणावाखाली आले आहेत. प्रवेश कधी होणार आणि महाविद्यालय कधी सुरू होणार असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

सीईटी सेलमार्फत राबवण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमांपैकी कृषी आणि फाईन आर्ट्स या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने सुरू करण्यात आली. मात्र उर्वरित अभ्यासक्रमांबाबत सीईटी सेलकडून कोणतीही सूचना विद्यार्थ्यांना दिली जात नव्हती. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले होते. मात्र २१ सप्टेंबरला सीईटी सेलकडून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मात्र त्याखालोखाल विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या एलएलबी तीन वर्षे, एलएलबी पाच वर्षे, बी.एड.एम.एड, बी.पी.एड, एम.एड, बी.ए. बी.एस्सी.बी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी तणावाखाली आहे. एलएलबी पाच वर्षाची परीक्षा १९ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी, एलएलबी तीन वर्षे ५५ हजार ५७१, बी.एड.एम.एड ९६१, बी.पी.एड ५१२९, एम.एड २४५६, बी.ए. बी.एस्सी.बी.एड ९२९ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत. म्हणजेच या सर्व अभ्यासक्रमाचे जवळपास ८४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कधी जाहीर करण्यात येणार, प्रवेश कधी होणार, महाविद्यालये कधी सुरू होणार, महाविद्यालये सुरू होताच परीक्षा घेण्यात येणार का असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सीईटी सेलकडे विचारणा केली असता प्रवेश प्रक्रियेची नियमावली शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आली असून, तिला मंजूरी मिळताच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी सीईटी सेलची स्थापना करण्यात आली असली तरी विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया घेण्यात नेहमीच विलंब येतो. अद्यापपर्यंत विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही, ही बाब चिंताजनक आहे. ही बाब आम्ही राज्यपाल व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
– अ‍ॅड. सचिन पवार, युवासेना (शिंदे गट)

Related posts

ठाणे महापालिका अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला विजेतेपद

Voice of Eastern

मुंबईत आढळले ओमायक्रॉनचे ७ रुग्ण

Voice of Eastern

चित्रपटात कामाचे आमिष दाखवून मराठी अभिनेत्रीची फसवणूक

Leave a Comment