Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे होळीपूर्वी भरणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

banner

मुंबई :

कोकणातून जाणा-या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तसेच होळीसाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने  कोकणात जाणार असल्याने होळीपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याची सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये रस्ता चौपदीकरणामुळे अपघात होवून सतत दुर्घटना होत आहेत यावर तातडीने कार्यवाही करावी अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडली. यावेळी या लक्षवेधी चर्चेत विधानसभा सदस्य आशिष शेलार, नितेश राणे, सुधीर मुनगंटीवार, शेखर निकम यांनी या विषयाच्या अनुषंगाने कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, परशुराम घाट हा कोकणातील जुना घाट असून त्यातील काही भाग सुमारे ३० ते ३५ मी. उंचीच्या डोंगररांगानी व सुमारे ६० ते ७० मी. उंचीच्या खोल द-यांनी व्यापलेला आहे तसेच कोकणभागामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सरासरी सुमारे चार ते साडेचार हजार मि.मि. पाऊस पडत असल्याने घाटमाथ्यातील एकंदरीत भौगालिक परिस्थिती विचारात घेतल्यास नैसर्गिक आपत्ती होऊन दरड कोसळण्यासारख्या घटना घडत असतात. मात्र अशा स्वरुपाच्या घटना भविष्यात घडू नयेत, याकरिता परशुराम घाटातील सुरक्षिततेच्या दृष्टीने १.२० कि.मी. लांबीपैकी ८०० मी. लांबीमध्ये चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.या घाटातील कामे २०२३ पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात दिली.यावेळी कोकणात ट्रॉमा सेंटर उभारणे,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कामेही पूर्ण करण्यात येतील तसेच ज्या जिल्ह्यांचे याबाबतीत प्रश्न आहेत त्यांची बैठक घेवून ते प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Related posts

ठाणे महापालिका अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला विजेतेपद

Voice of Eastern

मुंबई महापालिकेचा अभियांत्रिकी आविष्कार; १०० मीटर लांब गर्डर विनाखांब उभारला

आयएनएस रणवीरवर स्फोट; तीन जवान शहीद

Leave a Comment