Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठीय क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची दर्जेदार कामगिरी; २४० गुणासह प्रथम क्रमांक

banner

मुंबई : 

रौप्य महोत्सवी २५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत, महिला संघाने २४० गुणासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. दि. ०३ ते ७ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठ महिला संघांला २४० गुण मिळवून चषक (General Championship) मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. तर सर्वसाधरण चषक (Overall Championship) मध्ये समान गुण मिळाल्याने मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांना द्वितीय क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे या क्रीडा महोत्सवात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या फुटबॉल आणि बुद्धिबळ खेळप्रकारात महिला संघास प्रथम क्रमांक तर तर टेबल टेनिस खेळप्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.

यावर्षी २५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या दोन विद्यापीठात विभागून करण्यात आले होते. एकूण ९ खेळ प्रकारासाठी आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळप्रकाराचे आयोजन दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२४ या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे करण्यात आले होते. तर कबड्डी, खो-खो, फुटबॉल आणि बुद्धिबळ या स्पर्धांचे आयोजन ०३ ते ७ फेब्रुवारी, २०२४ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात राज्यातील एकूण २३ विद्यापीठे सहभागी झाले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे आयोजित स्पर्धेत अॅथलेटीक्स (मुले व मुली), बॅडमिंटन (मुले व मुली), बास्केटबॉल (मुले व मुली), टेबल टेनिस (मुले व मुली) आणि व्हॉलीबॉल (पुले व मुली) या संघानी भाग घेतला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अनुक्रमे कबड्डी (मुले व मुली), खो-खो (मुले व मुली), फुटबॉल (मुले व मुली) व बुध्दीबळ (मुले व मुली) या संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत महिला संघाने बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल व बुध्दीबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, टेबल टेनिस स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आणि खो-खो स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविले.

आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाने २४० गुण प्राप्त करुन अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करुन त्यांच्या भविष्कालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहन अमृळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts

हाफकिन महामंडळाला कायमस्वरुपी व्यवस्थापकीय संचालक मिळेना; सहा वर्षांत १३ संचालकांच्या बदल्या

Voice of Eastern

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शंकाच्या निरसनासाठी हेल्पलाईन सुविधा

विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी – राज्यपाल

Leave a Comment