मुंबई
स्वेटर घालू की छत्री घेऊ परिस्थिती सध्या मुंबई निर्माण झाली आहे. डिसेंबर महिना म्हणजेच थंडीचा महिना या दिवसात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. अशीच परिस्थिती बाकीच्या जिल्ह्यात देखील आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
राज्यात पुन्हा एकदा कालपासून हवामानात बदल झालेला आहे. त्यामुळे वातावरण सुद्धा बदलला आहे. आज सकाळपासून मुंबई अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.पूर्व उपनगरात चेंबूर घाटकोपर, सायन याठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली ती या अचानक आलेल्या पावसाने हवामान खात्यानेही पुढील दोन दिवस मुंबई आणि राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे यावर्षी डिसेंबर महिना आला तरी मुंबई अजूनही थंडीचा पत्ता नाही त्यातच आता हवामानात बदल झाल्याने मुंबईकरांना थंडीसाठी अजूनही काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
हवामान विभागाकडून राज्यभरात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळणार आहे.